भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचे स्थान सर्वोच्च आहे. हाच वारसा जपत स्थानिक श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था, जळगाव जामोद येथे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गोपूजन’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे, या संस्थेचे हे १२५ वे वर्ष असून, या ऐतिहासिक टप्प्यावर हा सोहळा पार पडल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

कार्यक्रमाला जळगाव जामोद परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून: ठाणेदार..नितीन पाटील, नगराध्यक्ष..गणेश दांडगे, उपाध्यक्ष..कैलास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष..सचिन देशमुख, शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख..दत्ता पाटील, नगरसेवक..परम राजपूत, नगरसेवक..सुनील रघुवंशी, व्यापारी संघटना अध्यक्ष..अजय वानखडे, ह.भ.प. गोमासे महाराज, डॉ. सतीश शिरेकार आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी इत्यादींची उपस्थिती होती.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गुलजार खाँ पठाण, नानासाहेब कांडलकर, राजाभाऊ कोकाटे, अभिमन्यू भगत, संतोष कुलथे, गजानन कसुरकार, डॉ. गौरव डोबे, तसेच गजानन महाराज पाणपोई संस्थानचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख, उमेश येऊल यांच्यासह शहरातील बऱ्याच पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोमातेचे पूजन करून उपस्थितांनी गोवंश रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. १२५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या संस्थेने नेहमीच गोसेवेचा आदर्श घालून दिला आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश भन्साली यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांनी मानले. या सोहळ्यासाठी गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, परिसरातील नागरिक, महिला आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.