जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत सामान्य, गरजु, गरीब नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ तसेच इंतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चोरटी वाहतूक आणि विक्री थांबवून, अशा घटनांना प्रतिबंध करुन, यामध्ये सहभागी ईसमांचा शोध घेवुन, त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीत स्थागुशाचे पथकाने दि.२८/०९/२०२५ रोजी अत्यावश्यक वस्तु अधिनयम अंतर्गत कारवाई केली. दि.२८/०९/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, ट्रकमध्ये शासनाचे सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत गरजु, गरीब व सामान्य नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ वाळगून, त्याची काळ्या बाजारामध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमध्ये तांदुळ जात आहे. या माहितीवरुन स्था.गु.शा.च्या पथकाने जळगांव जामोद ते नांदुरा रोड वरील गोळेगांव फाट्यावर सापळा रचून, माहिती प्रमाणे ट्रकला चालकासह पकडून कारवाई केली. सदर कारवाईमध्ये वाहन चालक याचे ताब्यातून ट्रक क्रं. जी. जे. ०३ सीयु २२८२ मध्ये २४० क्विटल, किंमत..६,७९,८००/- रुपयांचा सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदुळ हस्तगत करण्यात आला. ट्रक चालक यास तांदुळ कोठुन आणला याबाबत विचारणा केली, त्यानी सदरचा तांदुळ हा कुरणगाड बु. येथील विष्णु वाबाराव आटोळे यांचे गोडावुन मधुन भरुन आणलेला आहे असे सांगितल्यावर सदर गोडावुनचे ठिकाणी जावुन पाहिले असता. गोडावुन मध्ये ३४४ क्विटल तांदुळ कि.१०,३२,०००/- रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला तसेच तांदुळ मोजण्याकरीता वापरण्यात येणारे वजन काटे, पोते शिलाई मशीन व इतर साहित्य कि.४०२००/- रु असा एकुण १०,७२,२००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ट्रक मधील व गोडावुन मधील असा एकुण ५८४ क्विटल तांदुळ, किंमत..१७,५२,०००/- रु चा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत १) भटटी कादर कासम, वय ५५ वर्षे रा. अरव शेरी मालीया जि. राजकोट गुजरात राज्य, २) वैभव सुनिल आटोळे, वय २५ वर्ष, रा. कुरणगाड ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा, ३) अंकुश किसन आटोळे, वय २२ वर्ष रा. कुरणगाड ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा यांच्या ताब्यातुन…तांदुळ ५८४ क्विटल किं. १७,५२,०००/- रुपये तसेच ट्रक क्रं. जिजे ०३ – सीयू २२८२ किंमत.. २५,००,०००/-रु., असा एकूण- ४२,९२,२००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा, श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे. पोहेकॉ. जगदेव टेकाळे, पोकॉ. अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, निलेश राजपुत, चापोहेकॉ. विकास देशमुख स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने केली.