बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील गावकऱ्यांनी एकत्रित येत दिनांक १९ मे रोजी तहसीलदार व महावितरण अभियंता चौभारेवाला यांना गावाचा विज पुरवठा नेहमी खंडित होत असून विज पुरवठा सुरळीत करा याबाबत स्मरणपत्र देण्यात आले.
महावितरण विभागाला मागील वर्षी १९ जून २०२४ ला गावकऱ्यांनी याच विजेच्या समस्येबाबत निवेदन दिले होते, त्याला ११ महिने झाले त्या निवेदनावर दोन महिन्यापूर्वी गावापर्यंत महावितरणने पोल टाकून त्यावर तारही ओढले, परंतु गावचा विद्युत पुरवठा अद्यापही चालू केलेला नाही. ११ महिन्याचा कालावधी उलटूनही गावात विजेचा प्रश्न गंभीर असुन गावाचा विज पुरवठा खंडित झाल्यास सुरू होण्याची शास्वती नसते. गावाला सोळंके नामक लाईनमन असून तो गेल्या चार महिन्यापासून गावकऱ्यांना दिसलाच नाही. सध्या गावचा कारभार कंत्राटी कामगारांच्या हाती आहे. मागील वर्षी महावितरण ने एका महिन्यात सुनगाव चा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्याचे पत्र दिले होते, त्या पत्राला ११ महिने पूर्ण झाले तरीही गावचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. स्मरण पत्राची दखल घेऊन महावितरण ने ७ दिवसाच्या आत गावचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा.. अन्यथा खुट मोर्चा काढु असा इशाराच आता गावकऱ्यांनी महावितरणला दिला आहे..यावेळी सरपंच रामेश्वर अंबडकार, माजी पं.स. उपसभापती महादेव धुर्डे, कृषी मित्र मोहनसिंह राजपुत, अमोल येऊल, त्रिलोक राजपुत, पत्रकार गणेश (सरदार)भड, दिपक आकोटकार, तुकाराम मिसाळ, गजानन मिसाळ, रमेश वंडाळे, सुनील वंडाळे, आदित्य कंटाळे दुनियासिंग राजपूत, विजय वंडाळे, अनंता धर्मे यांच्यासह सुनगांव येथील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.