बुलढाणा जिल्ह्यात, जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना, या ग्रामपंचायतीचे येथील साफसफाईकडे व लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र वॉर्ड नंबर एक मध्ये दिसत आहे. सुनगाव येथील मुख्य प्रवेश द्वारा जवळच पाण्याचे डबके साचलेले आहे.

येथील सांडपाण्याचे व पावसाचे पाणी जाण्याच्या नाल्यांची व्यवस्था केलेली नाही व ठिकठिकाणी ग्रामपंचायतने रोड खोदून ठेवलेले आहेत, व पंधरा ते वीस दिवस होऊन सुद्धा रस्त्याचे काम करत नसल्याने नागरिकांना जाण्यायेण्यास त्रास होत आहे तसेच ठीक ठिकाणी सूनगावातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत त्यामुळे त्यामधून दुर्गंधी येत असून मच्छरांचे प्रमाण वाढले आहे व यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अशातच अवकाळी पावसाचे आगमन झाल्यामुळे येथील नाल्यांचे पाणी हे कित्येक नागरिकांच्या घरात घुसले आहे. तरी सुनगाव येथील नागरिक संजय निमकर्डे यांनी वारंवार सरपंच व ग्रामसेवक यांना सांगूनही ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या परिसरामध्ये सफाई कामगार हे योग्यरीत्या साफसफाई करीत नसल्याचे व परिसरात कचरा गाडी येत नसल्याचे संजय निमकर्डे यांनी सांगितले. तरी वार्ड नंबर एक मधील सदस्यांनी व सुनगाव ग्रामपंचायत ने याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली जावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत..