दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर 23 जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली..सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शिक्षक पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना बैलगाडी मध्ये बसवून जामोद केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन सातव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे, जि.प.मराठी शाळा मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, उर्दू प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शेख मजहर, बालरोग तज्ञ शालिग्राम कपले, ग्रामपंचायत सदस्य सौ.कुरवाडे, मुस्ताक अतारी, गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची गावभर मिरवणूक काढत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांकरिता मध्यान्न भोजनामध्ये खिचडीसह गोड पदार्थ म्हणून जेलेबी देण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शुजचे वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला‌.

विद्यार्थ्यांचे हित हे प्रथम कर्तव्य असून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे म्हणाले. यावेळी उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांचेसह जि.प.मराठी शाळेचे शिक्षक प्रदीप वाकेकर, खिरोडकर, बेग, अस्मिता क्षिरसागर, गवई, बोंबटकर, साबे, अंबडकार, पठाडे, बुटे इत्यादी शिक्षक व शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या तसेच पत्रकार अनिल भगत यांचीही उपस्थिती होती, तर शाळेचे कर्मचारी मनोहर वानखडे,राजु अंदुरकार, राजू तडवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले..