सुरज यादव यांनी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय खामगांव यांच्या मार्फत.. जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे निदर्शनात आणून दिले की बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या खामगांव उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डा मध्ये भरती असलेल्या गरीब आणि गरजू रुग्णांना डॉक्टर कोणत्याही प्रकारची तपासणी न करता तोंडी उपचार देत आहेत. तसेच वार्डात मॉनिटर, बिपी, ऑपरेटर, इसीजी मशीन उपलब्ध नाही. रुग्णांना उपचार पाहीजे तसा मिळत नाही शेवटी नाईलाजाने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागलात. फक्त परिचारिका यांच्या भरवश्यावर सामान्य रुग्णालय चालत आहे. रुग्णांची योग्य व संपूर्ण तपासणी करून योग्य सल्ला देण्यात यावा तसेच अनेक रुग्णांना फक्त त्यांच्या आरोग्याच्या समस्येबद्दल विचारून तोंडी औषधी लिहून देण्यात येते, हा खूप धक्कादायक आणि तेवढाच धोकादायक प्रकार ह्या रुग्णालयात सुरू आहे. अश्याप्रकारे गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा एक गंभीर प्रकार असून रुग्णालयात अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
सूरज यादव यांना मिळालेल्या तक्रारीवरून त्यांना हे समजले की वॉर्ड मध्ये इंचार्ज डॉक्टराची दोन वेळा फेरी आवश्यक असताना एकच वेळ फेरी होते..शासकीय परीपत्रका नुसार होत नाही फक्त एकच भेट रुग्णांना देण्यात येते. वॉर्डमधील डॉक्टरांनी नियमाप्रमाणे किमान दोन वेळा नियमित भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी केली पाहिजे पण तसे होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीव धोक्यात आल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी रुग्णालयची राहील. म्हणून त्यांनी विनंती केली आहे की, आमच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ओपीडी मधील रुग्णांची योग्य व संपूर्ण तपासणी करावी व तसेच नवीन शिकाऊ डॉक्टर यांच्या सोबत सिनियर डॉक्टरला बसवायला पाहीजे. ओ पी डी मध्ये व लवकरात लवकर फिजिशियन, बालरोग तज्ञ्, प्रसूती स्त्री रोग तज्ञ्, दंत रोग तज्ञ् हे लोकं कधीच बसत नाही ओ पी डी मध्ये यांनी पण तिथं दररोज बसायला पाहीजे असे न झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने खामगांव येथील सामान्य रुग्णालयासमोर मोठे आंदोलन छेडू.. व त्यानंतर सर्व जवाबदारी प्रशासनाची राहील याची दखल घ्यावी..असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.