नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील..समाजसेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व डाॅ.प्रदिप गायकी वाहतुक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मानाचा सर्वोच्च डि.लिट.. डाॅक्टर आँफ लिट्रेचर हा बहुमान प्राप्त झाला आहे. अमेरीका येथील “सेडरब्रुक” विद्यापिठाने डाॅ. प्रदिप सुगदेव गायकी” यांच्या गेल्या 35 वर्षातील कार्यसंग्रहाचा तथा त्यांनी केलेल्या ऊच्चकला क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, कामगार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र..यासह अनेक कार्यसंग्रह त्यांची चिकाटी, तज्ञ अभ्यास, व समाजकार्य याचा तज्ञ समितीच्या गटाने अभ्यास करीत, अभ्यासाअंती त्यांना डाॅक्टर आँफ लिट्रेचर डि.लिट.. हा शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च मानद बहुमान देऊन दिल्ली येथिल पंचतारांकीत रेसिडेन्सी मध्ये विद्यापिठाचे वतीने प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कोमल शर्मा यांचे हस्ते दिनांक 2 आँगष्ट 2025 ला भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
