एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज यादव खामगांव महाराष्ट्र यांना दिनांक 03/08/2025 रोजी चिटणवीस सेंटर सिव्हील लाईन नागपूर येथे दर्पण पत्रकार & संपादक फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पांडे यांच्या टीम तर्फे समाज भुषण पुरस्कार 2025 नी सम्मानीत करण्यात आले. 26 जुलै शनिवार रोजी एसडब्ल्यूडीटी ब्लड वॉरियर्स अवार्ड 2025 नी कोलकाता मध्ये सम्मानित करण्यात आले हा सम्मान समारोह बेस्ट बंगाल मधील कोलकाता स्थित हुबली रिसडा साईं वेलफेयर डेवलपमेंट ट्रस्ट द्वारा आयोजीत कार्यक्रमा मध्ये मुख्य अतिथि कैप्टन सुरेश कुमार सैनी,अजय प्रसाद, सूरज बुढ़िया, काजल सिक्का आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाला. राजस्थान इंटरनैशनल सेंटर जयपूर मध्ये भव्य राष्ट्रीय सम्मान समारोहाचे आयोजन ख्वाब फाउंडेशन संस्थापक मुन्नाकुमार यांच्या टीम तर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते दिनांक 27 जुलै रोजी सुरज यादव यांना युथ रत्न अवॉर्ड 2025 नी सम्मानीत करण्यात आले या कार्यक्रमाला देश विदेशातील विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आला. सुरज शिवमुरत यादव यांच्या गौ – सेवा रुग्णसेवा रक्तसेवा कार्याची दखल घेत एक राज्यस्तरीय तर दोन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देण्यात आले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सागर बहादरे यांनी दिली.