बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव शहरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी भूमीपुत्रांचे भीक मांगो आंदोलन…राज्यातील जनतेला पीक कर्ज माफ करू व सातबारा कोरा करू असे आश्वासन महायुतीच्या तत्कालीन उमेदवारांनी जाहीरनाम्यातूनही दिले होते. सत्ता स्थापनेनंतर आता शेतकरी त्या आश्वासनाच्या पूर्ततेची आतुरतेने वाट बघत आहेत. शेतमालाच्या बाजार भावात झालेली घसरण, उत्पादनात मोठ्या प्रमाणात झालेली घट, सतत येत असलेले अस्मानी संकट, विविध आर्थिक अडचणींशी करावा लागत असलेला सामना यामुळे हजारो शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. शेतकर्यांनी कर्ज भरावे म्हणून बँकांकडून तगादा लावला जात असल्याने, शेतकर्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे.
त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच शेतकर्यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवलेला आहे. अशाप्रकारे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी २०२३-२४ चा पिक विमा पासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करावी. केंद्र शासनाने बियाणे, खते, अवजारे, किटकनाशकांवर जीएसटी लावलेला आहे. शेतकर्यांना जीएसटी कर परत मिळावा म्हणून शासनाने काही उपाययोजना केलेली नाही. इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल बनवून कारखानदार, डिलर, दुकानदार जीएसटी परतावा परत मिळवतात. तशी सुविधा शेतकर्यांना नाही. त्यामुळे शेतीमालावरील १८% जीएसटी कमी करावा. वरील सर्व मुद्दे घेऊन जळगांव जामोद तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व नागरिकांनी गुरूवार २२ मे २०२५ रोजी उपविभागीय कार्यालयासमोर ‘ भिक मांगो आंदोलन’ केले.
शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून एकूण १२०० रुपये भीक स्वरूपात मिळालेली रक्कम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे. यावेळी शेतकरी आंदोलक तुकाराम पाटील, माजी सरपंच वडशिंगी राम वानखडे, विशाल टाकोते पाटील, कार्तिक राऊत, आकाश उमाळे, रामेश्वर काळे, गणेश बोदडे, दीपक आढाव पाटील, अशपाक देशमुख, राम रोठे, सुपडा गावंडे, वासुदेव खोद्रे, गोपाल उमरकर, प्रशांत जाधव, पंकज नटकूट, अभिषेक हिस्सल, विशाल भालेकर यांच्यासह बहुसंख्येने भूमिपुत्र या भीक मांगो आंदोलनात सहभागी झाले होते.