बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी बांधवांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आदिवासी बांधवांचे वन विभागाने उध्दवस्त केलेली घरे त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावी, आदिवासी जातीचे प्रमाणपत्र दाव्यात दाखल असतांना गैरआदिवासी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ ॲट्रासिटी गुन्हा दाखल करावा,

माळेगाव येथील आदिवासी बांधवांच्या शेतीमध्ये वन विभागाने पाडलेली घरे पूर्ववत करुन शेती वहीतीलायक करुन द्यावी, माळेगाव येथील जि. प. शाळा इतरत्र हलविण्यात येऊ नये व अंगणवाडी पूर्ववत चालू करण्यात यावी या मागण्यासाठी 16 जून पासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने आज सकल आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला आहे. यावेळी शेकडो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.