अमरावती शहरातील फ्रेजरपुरा चौकातील वडार पुरा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूने आ. रवी राणा यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले ,, अनेक वर्षांपासून वडार समाजाची समाजाकरिता प्रवेशद्वार असावं अशी मागणी होती ,, अखेर आमदार रवी राणा यांच्या १५ लक्ष निधीतून आता समाजाचे प्रवेशद्वार साकारले जाणार आहे .. यावेळी शेकडो वडार समाज बांधवानी हजेरी लावून घोषणा दिल्या ,,, समाजाच्या वतीने आ रवी राणा यांना औक्षण करून स्वागत करण्यात आले ,,
रवी राणा सह समाजबांधवांच्या हस्ते पूजन आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले ..वडार समाजाची अनेक वर्षांपासून समाजाचे प्रवेशद्वार असावं अशी मागणी होती , याला मात्र विशिष्ट लोक विरोध करीत होते मात्र पोलिसांनी त्यांना जागा दाखविली ,, जास्त मस्ती करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवू अशी प्रतिक्रिया आ रवी राणा यांनी व्यक्त केली .. गेल्या काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी प्रवेशद्वार वरून दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता , वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता ,,पोलिसांनी गटातील लोकांची बैठक घेऊन शांत राहण्याचे आवाहन सुद्धा केले होते ,, मात्र आता रवी राणा यांनी पुढाकार घेऊन वडार समाजाकरिता प्रवेश द्वार होण्यासाठी समोर येऊन भूमिपूजन पूर्ण केले.